विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ करणार आहे. कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) त्यांची गाठ पडणार आहे. RCB vs SRH सामन्यापूर्वी विराट कोहली ( Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांच्यासह RCBच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर त्यांचे नाव बदललेली पाहायला मिळाली. त्यामागचं नेमकं कारण काय? ( IPL 2020 Live Updates, Click here)
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!
IPL 2020मध्ये RCBसंघ कोरोना वॉरियर्सचा अनोख्या पद्धतीनं सन्मान करणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत RCBच्या खेळाडूंच्या जर्सीवर 'My Covid Heros' असे लिहिलेले पाहायला मिळणार आहे. विराट म्हणाला की,''या स्तुत्य उपक्रमात एक टीम म्हणून आम्ही प्रथमच सहभागी होत आहोत. कोरोना व्हायरसच्या संकटात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांची सेवा केली, हा उपक्रम त्यांना समर्पित आहे. RCBकडून आम्ही त्यांना सलाम करतो. ही जर्सी परिधान करताना, आम्हालाच अभिमान वाटत आहे.'' ( IPL 2020 Live Updates, Click here)
मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक
तो पुढे म्हणाला,'' त्यांनी ज्या आव्हानांचा सामना केलाय, त्याचा विचारही आपण करू शकत नाही. मागील सात महिने मी माझ्या सोसायटीत दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहतोय. त्यांच्याकडून मलाही बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्याकडे पर्याय होता, परंतु त्यांनी कामापासून पळ काढला नाही.'' ( IPL 2020 Live Updates, Click here)
एबीनं त्याच्या ट्विटर हँडलवरील नाव परीतोष पंत असे केलं. परितोष यांनी त्याची सहकारी पूजा हिच्यासह 'Project Feeding from Far' ही चळवळ उभी केली. त्यामाध्यमातून लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरजूंना दोन वेळचं जेवण देण्याचं काम केलं. त्यामुळे या परीतोष पंत या नावाची जर्सी घालून एबी यंदाची IPL खेळणार आहे.''
अन्य म्हत्त्वाच्या बातम्या
राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार
नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर