११ चौकार, १२ षटकार! संघ गंभीर, Riyan Parag खंबीर; कर्णधाराने कुटल्या १५५ धावा अन्... 

रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी रियान परागची ( Riyan Parag ) कॅप्टन्स इनिंग्ज पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 11:29 AM2024-01-08T11:29:29+5:302024-01-08T11:30:16+5:30

whatsapp join usJoin us
Riyan Parag captain's knock in the Ranji Trophy, smashed 155 runs (86) with 11 fours and 12 sixes. A crazy innings in the team total of 245 | ११ चौकार, १२ षटकार! संघ गंभीर, Riyan Parag खंबीर; कर्णधाराने कुटल्या १५५ धावा अन्... 

११ चौकार, १२ षटकार! संघ गंभीर, Riyan Parag खंबीर; कर्णधाराने कुटल्या १५५ धावा अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy 2024  (Marathi News) :  रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी रियान परागची ( Riyan Parag ) कॅप्टन्स इनिंग्ज पाहायला मिळाली. छत्तीसगडविरुद्धच्या लढतीत फॉलोऑन घेऊन मैदानावर उतरलेल्या आसामची अवस्था वाईट झाली होती, परंतु रियान पराग खंबीरपणे उभा राहिला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. तो खेळला नसता तर आसाम संघावर डावाने पराभवाची नामुष्की ओढावली असती. रियानने एकहाती फटकेबाजी करताना ५४ चेंडूंत शतक झळकावले. १५५ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावण्यात छत्तीसगडला यश आले.

चेतेश्वर पुजाराने १७वे द्विशतक झळकावले, आशियातील दिग्गजांना मागे टाकले; BCCIला चॅलेंज दिले


छत्तीसगडच्या पहिल्या डावातील ३२७ धावांच्या प्रत्युत्तरात आसामचा पहिला डाव १५९ धावांवर गडगडला. छत्तीसगडच्या सौरभ मझुमदारने ४१ धावांत ६ विकेट्स घेतल्या, तर रवी किरणने ३ बळी घेत त्याला साथ दिली. आसामकडून देनिश दास ( ५२) याने खिंड लढवली. फॉलोऑन मिळालेल्या आसामला दुसऱ्या डावातही काही खास करता आले नाही. रिशव दास ( १७) व एस घाडीगावकर ( १६) यांच्यानंतर राहुल हझारीका ( ३९) बाद झाल्याने आसामची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली. रियान एका बाजूने मैदानावर उभा राहिला, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही.

रियानने ८७ चेंडूंत ११ चौकार व १२ षटकारांसह १५५ धावांची स्फोटक खेळी केली. आसामचा दुसरा डाव ५३.२ षटकांत २५४ धावांवर गडगडला. रियानने एकट्याने १५५ धावा केल्या, तर ९९ धावा या अन्य फलंदाजांनी मिळून केल्या. त्यात ६ अतिरिक्त धावा आहेत. छत्तीसगडसमोर विजयासाठी ८७ धावांचे लक्ष्यच आसामला ठेवता आले.

Web Title: Riyan Parag captain's knock in the Ranji Trophy, smashed 155 runs (86) with 11 fours and 12 sixes. A crazy innings in the team total of 245

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.