महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या निमित्तानं. इंडिया लिजंड्स संघाचा कर्णधार असलेल्या तेंडुलकर ७ वर्षांनंतर मैदानावर उतरला आणि आजही त्याचा जादू कायम असल्याची प्रचिती आली. मुंबईच्या वानखेडे स्टेडिवरून नव्या इनिंगची सुरुवात करणाऱ्या तेंडुलकरनं मंगळवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही विजय मिळवला. या सामन्यात तेंडुलकर पहिल्याच षटकात भोपळा न फोडताच माघारी परतला. पण, इरफान पठाण आणि मोहम्मद कैफ यांनी भारतीय संघाला ५ विकेट्स राखून श्रीलंका लिजंड्स संघावर विजय मिळवून दिला.
भारतीय संघानं सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवला होता. या लढतीत तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी पुन्हा मैदानावर उतरली होती. त्यांच्या फटकेबाजीनं क्रिकेटप्रेमींना पुन्हा मंत्रमुग्ध केले. पण, डी वाय पाटील स्टेडियमवर चाहत्यांची निराशा झाली. नाणेफेकीचा कौल जिंकून तेंडुलकरने श्रीलंकेला प्रथम फलंदाजीला बोलावलं. तिलकरत्ने दिलशान ( २३), रमेश कालुविथरना ( २१) आणि चमारा कपुगेदरा ( २३) यांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं ८ बाद १३८ धावा केल्या. मुनाफ पटेलनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. चामिंडा वासने तिसऱ्या चेंडूवर तेंडुलकरला ( ०) यष्टिरक्षक कालुवितरणाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!