Join us  

रोहित शर्मानं तोडला सचिन, सेहवाग आणि युवराजचा विक्रम 

रोहित शर्मानं पाचव्या वन-डेमध्ये 126 चेंडूत 115 धावांची संयमी खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं 11 चौकार आणि चार गगणचुंबी षटकार खेचले. या खेळीसह त्यानं अनेक विक्रमांना गवसणा घातली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 2:14 PM

Open in App

पोर्ट एलिझाबेथ - हिटमॅन रोहित शर्मानं वन-डेत द्विशतक आणि टी-20त शतक ठोकत वर्षाखेरीस  क्रिकेटविश्वात धुमाकुळ घातला होता. पण दक्षिण आफ्रिकेतील उसळ्या घेणाऱ्या खेळपट्टीवर तो धावा करण्यात अपयशी ठरला होता. दोन कसोटीतील चार डावात त्याला फक्त 78 धावा करता आल्या होत्या. यावेळी त्याची 47 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. कसोटीनंतर पहिल्या चार वडेतमध्ये तो अडखळत खेळत असल्याचे पहायला मिळाले. पण पाचव्या वन-डेमध्ये शतकी खेळी करत 2018 मधील पहिले शतक झळकावले आहे. रोहित शर्मानं पाचव्या वन-डेमध्ये 126 चेंडूत 115 धावांची संयमी खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं 11 चौकार आणि चार गगणचुंबी षटकार खेचले. या खेळीसह त्यानं अनेक विक्रमांना गवसणा घातली आहे. सचिन, युवराज आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गज खेळाडूंचा विक्रम त्यानं मोडला आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षातमध्ये रोहित शर्मानं 65 षटकार लगावले आहेत  2017-18 च्या वर्षात रोहितनं 65 षटकार लगावले होते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 265 षटकार ठोकले आहेत. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडित काढला आहे. सचिनच्या नावावर 264 षटकार आहेत. तर युवराज सिंगच्या नावावर 251 आणि सौरव गांगुलीच्या नावावर 247 षटकारांची नोंद आहे. भारताकडून सर्वाधिक षठकार माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहेत. धोनीने आतापर्यंत 338  षठकार लगावले आहेत. 

सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे हे 15 वे शतक तर आंतरराष्ट्रीय करियरमधील 17 वे शतक आहे. रोहित शर्मानं विरेंद्र सेहवागच्या शतकाचाही विक्रम मोडीत काढला. सलामीवीर म्हणून सेहवागनं 14 शतके ठोकली आहेत. काल रोहित शर्मानं 15 वे शतक झळकावत सेहवागचा विक्रम मोडित काढला. रोहित शर्माच्या पुढे आता फक्त सचिन तेंडूलकर(45) आणि गांगुली (19) हे दिग्गज आहेत. सलामीवीर म्हणून भारताकडून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यामध्ये धवन 13 शतकासह पाचव्या स्थानावर आहे, 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८