भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मानं दीपावलीच्या शुभेच्छा देताना Eco Friendly दिवाळीचे आवाहन केले. त्यानं एक व्हिडीओ शेअर करताना फटाक्यांच्या आवाजानं पाळीव प्राणी घाबरतात, असे सांगितले. त्यामुळे पर्यावरणाचे जतन करून दिवाळी साजरी करा असे आवाहन केले. रोहितचे हे आवाहन चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही. इतकीच पर्यावरणाची काळजी आहे, तर IPL खेळणं सोड असा सल्लाच रोहितला दिला.
तुझ्या बॅटसाठी किती झाडे तोडली? 'आरे'साठी बॅटींग करणाऱ्या रोहितची नेटिझन्सकडून धुलाईभारताच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला येताना दणका उडवून दिला. त्यानं दोन्ही डावांत शतकी खेळी करून टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 203 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. मैदानावरील या कामगिरीनंतर रोहित मंगळवारी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिला. मुंबईकर रोहितनं आरेच्या मुद्यावर त्याची भूमिका स्पष्ट करताना वृक्षतोड चुकीची असल्याचं मत व्यक्त केलं. आरेच्या मुद्यावर विविध NGO आणि बॉलिवूड सेलेब्रिटी एकवटले असताना प्रथमच क्रिकटेपटूनं यावर मत व्यक्त केलं आहे. रोहितची ही भूमिका काहींना पटली, तर काहींनी त्याला विरोध केला. रोहितला नेटिझन्सने चांगलेच फटकारले.
आरेत उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी जवळपास दोन हजार झाडं तोडण्यात आली. त्यावरून बराच वाद सुरू होता. त्यात मंगळवारी रोहितनं उडी मारली. त्यानं ट्विट केलं की,''जीवनावश्यक वस्तूचं असं नुकसान करणं चुकीचं आहे. मुंबईतील वातावरण संतुलित ठेवण्यात आरेचा महत्त्वाचा वाटा आहे. असं असूनही आपण तिथे वृक्षतोड कशी करू शकतो, शिवाय तेथील वन्यजीवांच्या अस्तित्वाचं काय?''