Rohit Sharma, IND vs ENG : भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यातल्या सराव सामन्यातील तिसऱ्या दिवशी BCCIचे टेंशन वाढवणारे वृत्त समोर आले. दुसऱ्या डावात केएस भरत व शुबमन गिल हे सलामीला आल्यापासून रोहित शर्मा ( Rohit Sharma) कुठेय, हा प्रश्न चाहत्यांना सतावू लागला होता... ६ फलंदाज माघारी परतूनही रोहित न आल्याने संशयाची पाल चुकचूकली अन् BCCI ने रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट केले. रोहित व टीम इंडियातील इतर खेळाडूंवर BCCI नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करत भारतीय खेळाडू लंडनमध्ये फिरताना दिसले आणि त्यानंतर आता रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्याचे खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे.
''टीम इंडियाच्या खेळाडूंची ही बेजबाबदार वर्तवणूक आहे. त्यांना संभाव्य धोक्याबाबत सांगण्यात आले होते आणि त्यांना मास्क घालत्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरू नका असा सल्ला दिला गेला होता. पण, रोहित, विराट, रिषभ आणि जवळपास साऱ्यांनीच याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. त्यानंतर हे असे होणारच होते ( रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह),''असे बीसीसीआयच्या सीनियर अधिकाऱ्यांनी Inside.sports शी बोलताना म्हटले.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत रोहित शर्माचे खेळणे अनिश्चित?
- २५ जूनला रोहितची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली
- त्यानंतर रोहित आता पाच दिवस विलगिकरणार राहणार आहे
- ३० जूनला त्याची दोन वेळा RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला खेळता येईल
- भारताच्या अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ते मंगळवारी बर्मिंगहॅमसाठी रवाना होतील.
- जसप्रीत बुमराहला नेतृत्व करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे, रिषभ पंत कसोटीत नेतृत्व करण्यासाठी अद्याप तयार नसल्याचे बीसीसीआयला वाटते.
ते पुढे म्हणाले,''जसप्रीत बुमराहला परिस्थितीची कल्पना देण्यात आली आहे आणि त्याला कर्णधारपदासाठी तयार राहण्यास सांगितले गेले आहे. रिषभ पंत हा युवा आहे आणि त्याला कसोटीसाठी अजून तयार व्हावे लागणार आहे. रोहित न खेळल्यास रिषभ पंत उप कर्णधार असेल.''