कोलंबो - भारत आणि बांगलादेश यांच्यात निदाहास चषकात रोहित शर्माने झळकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर भारताने भारताने चषकावर नाव कोरलं. श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये कार्तिकने भारताकडे विजय खेचून आनला. काल झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं 56 धावांची निर्णायक खेळी केली. 42 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने त्यानं आपले 16 व्यांदा 50 पेक्षा आधिक धावा केल्या आहेत. यावेळी त्याने गेल आणि मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडित काढला. आता त्याच्यापुढे फक्त विराट कोहली आहे. विराट कोहलीने टी-20मध्ये 18 वेळा हा पराक्रम केला आहे. तसेच या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आणि विंडीजचा गेल तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 15 वेळा अशी कामगिरी केली आहे.
सात हजारी रोहित -
रोहित शर्मानं काल झालेल्या सामन्यात टी--20मध्ये सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण दहावा तर भारताचा तिसराच खेळाडू ठरला. याआधी भारताकडून विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. काल झालेल्या सामन्यात 26 वी धाव घेताच रोहित शर्मा सात हजार धावा करणारा भारताचा तिसरा तर जगातला दहावा फलंदाज बनला. या यादीत वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज गेल प्रथम स्थानावर आहे. गेलने 11068 धावा केल्या आहेत.
- फाइनलचा सुपर कॅप्टन
टी-20मध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माने आतापर्यंत पाचवेळा खेळला आहे. या पाचही सामन्यात त्याने भारताला विजय मिळवून दिला आहे. यामध्ये आयपीएल फायनलचाही समावेश आहे.
भारताचा रोमांचकारी विजय -
अखेरच्या २ षटकात विजयासाठी ३४ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ ८ चेंडूत नाबाद २९ धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध ४ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी२० तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. प्रेमदासा स्टेडियमवर १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने २० षटकात ६ बाद १६८ धावा केल्या.
Web Title: Rohit Sharma's big record, now only Virat Kohli is ahead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.