नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाची सध्याची निवड समिती ही कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या तालावर नाचणारी आहे. त्यांच्याकडे विराट व शास्त्री यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठीचा पुरेसा अनुभव नाही, अशी टीका भारताचे माजी निवड समिती सदस्य सय्यद किरमानी यांनी केली. करुण नायर व मुरली विजय यांना कसोटी संघातून बाहेर काढल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर बोलताना हे भाष्य केले.
पाच सदस्यीय निवड समितीत आतंरराष्ट्रीय सामन्यांचा पुरेसा अनुभव नाही. प्रसाद यांनी 6 कसोटी व 17 वन डे सामने खेळले आहेत. उर्वरित सदस्यांमध्ये शरणदीप सिंह ( 2 कसोटी व 5 वन डे), देवांग गांधी ( 4 कसोटी व 3 वन डे) , जतिन परांजपे ( 4 वन डे) आणि गगन खोडा ( 2 वन डे) यांच्याकडेही अनुभवाची कमतरता आहे.