मुंबई, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विश्वचषकात पाकिस्तानशी खेळावे की खेळू नये, याबाबत चर्चा सुरु आहेत. पण भारताचे माजी तंत्रशुद्ध फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. क्रिकेटपेक्षा देश नक्कीच महत्वाचा आहे. त्यामुळे सरकारने पाकिस्तानशी खेळू नये, असा निर्णय घेतला तर त्याचा आदर करायलाच हवा, असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
याविषयी मांजरेकर म्हणाले की, " भारताने पाकिस्तानशी खेळावे किंवा नाही, हे सरकार ठरवू शकते. सरकारने ठरवलं की पाकिस्तानशी खेळू नये, तर त्या निर्णयाचा आदर करायला हवा. कारण हे एक मोठे प्रकरण आहे. स्पोर्टस हा छोटा भाग आहे. क्रिकेटपेक्षा नक्कीच देश महत्वाचा आहे. पण जर भारताच्या सरकारने परवानगी दिली तर पाकिस्तानशी खेळायला हरकत नसावी.''