ठळक मुद्देविश्वचषकासाठी भारत सर्वात बलवान संघ
मुंबई, भारतीय संघाचा नेमका कर्णधार कोण, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे. कारण विराट कोहली भारताचा कर्णधार असला तरी मर्यादीत क्रिकेट सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना आपण पाहिले आहे. त्यामुळे नेमका कर्णधार कोण, या प्रश्नावर भारताचे माजी तंत्रशुद्ध फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. संघातील मार्गदर्शक आणि कर्णधार यांच्या भूमिका नेमक्या काय असतात. त्याचबरोबर हे सारे करताना कोणत्या गोष्टी घडत असतात, याबद्दल मांजरेकर यांनी टिपण्णी केली आहे.
भारताचा नेमका कर्णधार कोण, याबाबत मांजरेकर म्हणाले की, " भारताचा खरा कर्णधार विराट कोहलीच आहे. कारण जर धोनी ग्रेट असला असता तर तोच कर्णधार राहिला असता. जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी नसते तेव्हा मार्गदर्शन करणे अधिक सोपे असते. कारण जबाबदारी आणि मोठे निर्णय घेणे कर्णधाराचे काम असते. ते कोहलीचेच काम आहे. दुसरीकडे कोहली हे धोनीला हे करायला देतोय, त्याबाबत कोणतीही हरकत घेत नाही, हेदेखील महत्वाचे आहे."
इंग्लंडमध्ये भारताचे स्पिनर चमकतील
जगामध्ये रीस्ट स्पिनर्स यशस्वी ठरत आहेत. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे कोणत्याही विकेटवर विकेट्स काढून शकतात. दोघे चांगले गोलंदाज आहेत. जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असेल तर तसे खेळाडूही आपल्याकडे आहेत. संघात चांगले गोलंदाज असणं महत्वाचं. इंग्लंड विचार करते की, अष्टपैलू खेळाडू महत्वाचे वाटतात. पण त्यांनी जास्त मोठ्या स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. जेव्हा तुमच्याकडे सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज सर्वोत्तम असतील तर तुम्ही चॅम्पियन टीम असता. कारण जेव्हा तुम्ही एका गोलंदाजापेक्षा अष्टपैलू खेळाडूला स्थान देता आणि परिस्थिती बिकट असेल तर अष्टपैलू खेळाडू दडपण हाताळू शकत नाहीत.
विश्वचषकासाठी भारत सर्वात बलवान संघ
विश्वचषकासाठी भारत हा सर्वात चांगला संघ आहे. पण विश्वचषकात चांगला संघ जिंकेल, असे पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलियाचा चांगाल खेळ होतोय. पहिले काही सामने ते जिंकले तर त्यांना जेतेपदाची संधी असेल. न्यूझीलंडचा संघ चांगला आहे पण त्यांच्याकडे जिंकण्याची इर्षा नाही. इंग्लंडचा संघ दमदार असला तरी त्यांच्याकडे विश्वचषक जिंकण्याची जिद्द दिसत नाही.
Web Title: Sanjay Manjrekar Exclusive: MS Dhoni guide, but Virat Kohli is the true captain of India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.