Join us  

जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-२० लीग 'सौदी अरेबियात', IPLच्या मालकांसमोर ठेवला प्रस्ताव 

saudi arabia cricket : दिवसांदिवस जगभरात क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 4:12 PM

Open in App

ipl saudi arabia । नवी दिल्ली : दिवसांदिवस जगभरात क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे. भारतात मागील १६ वर्षांपासून जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. आयपीएलची लोकप्रियता पाहता आता सौदी अरेबियाला देखील या मोठ्या स्पर्धेची भुरळ पडल्याचे दिसते आहे. रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबिया आयपीएलमधील फ्रँचायझींसोबत चर्चा करत आहे. याशिवाय सौदी अरेबिया आपल्या फ्रँचायझी लीगला यशस्वी बनवण्यासाठी बीसीसीआयकडे भारतीय खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. खरं तर बीसीसीआय कोणत्याही भारतीय खेळाडूला आयपीएल व्यतिरिक्त इतर लीगमध्ये खेळण्यास परवानगी देत नाही. भारताचा खेळाडू निवृत्तीनंतरच इतर लीगमध्ये खेळू शकतो.

द एज या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सौरी अरेबियात होणाऱ्या लीगबद्दल जवळपास एक वर्षापासून चर्चा सुरू आहे. या देशाने मागील काही कालावधीपासून क्रीडा क्षेत्रात खूप गुंतवणूक केली आहे. गोल्फ हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. सौदी अरेबियाने पब्लिक इन्वेस्टमेंट फंडातून प्रीमिअर लीगचा फुटबॉल क्लब 'न्यूकासल यूनायडेड'ला पुढे नेले आहे. त्यामुळे आता क्रिकेटमधील गुंतवणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ICC च्या अध्यक्षांनी म्हटले... दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी या आधीच म्हटले होते की, फुटबॉल आणि F1 सारख्या खेळांमध्ये पैसे गुंतवल्यानंतर सौदी अरेबिया क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. बार्कले यांनी अधिक म्हटले की, "ते इतर खेळांमध्ये ज्या प्रकारे सहभाग नोंदवत आहेत ते पाहता मला वाटते की क्रिकेट देखील त्यांना आकर्षित करेल. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सौदी अरेबियासाठी क्रिकेट देखील चांगले काम करेल. ते खेळात गुंतवणूक करण्यासाठी खूप इच्छुक आहेत आणि यावरून स्पष्ट होते की क्रिकेटला अधिकच उभारी मिळणार आहे." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३सौदी अरेबियाटी-20 क्रिकेटआयसीसी
Open in App