इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्या ताफ्यात नुकताच राखीव खेळाडू म्हणून दाखल झालेला न्यूझीलंडचा गोलंदाज आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघाकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी RCBच्या ताफ्यातील दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झम्पा व केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. आज रात्री ते ऑस्ट्रेलियासाठी विमानात बसणार आहेत. त्यामुळे RCB केन रिचर्डसनला बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या गोलंदाजाची निवड केली आहे, असे वृत्त ESPNcricinfo दिले आहे. सहा महिन्यापूर्वी यॉर्कर किंग बनला, ऑस्ट्रेलियात इतिहास रचला अन् IPL 2021च्या मध्यंतरात हॉस्पिटलमध्ये पोहोचला
स्कॉट कुग्गेलेईजन ( Scott Kuggeleijn) असे या गोलंदाजाचं नाव असून तो दोन दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात राखीव खेळाडू म्हणून दाखल झाला होता. स्कॉटनं २०१९मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं प्रतिनिधित्व केलं होतं आणि दोन सामन्यांत त्यानं दोन विकेट्स घेतल्या होत्या. तो CSKच्या ताफ्यात लुंगी एनगिडी याला रिप्लेसमेंट म्हणून आला होता. त्यानंतर त्याला संघानं रिलीज केलं. २०२१च्या आयपीएलमध्ये ५० लाख मुळ किंमत असलेल्या स्कॉटसाठी कोणीच बोली लावली नाही. स्कॉटनं न्यूझीलंडकडून १६ ट्वेंटी-२० सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या, तर ७९ धावा केल्या आहेत. त्यानं दोन वन डे सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. मानलं भावा; ब्रेट ली यानं ऑक्सिजन खरेदीसाठी केली ४३ लाखांची मदत; म्हणाला, भारत हे माझं दुसरं घर!
ऑस्ट्रेलियानं १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर बंदी घातली आहे. त्यामुळे १५ मे पर्यंत ही दोघं मायदेशात परत जाऊ शकणार नाहीत. रविवारी २५ एप्रिलला ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही खेळाडूंनी RCBचं बायो बबल सोडलं आणि मुंबई विमानतळानजीक हॉटेलमध्ये शिफ्ट झाले. त्यानंतर RCBचा संघ पुढील टप्प्यासाठी अहमदाबाद येथे रवाना झाला. पॅट कमिन्सनंतर KKRच्या आणखी एका खेळाडूचा पुढाकार; गौतम गंभीर फाऊंडेशनला केली मदत