Join us  

Shafali Verma : भारताच्या १७ वर्षीय शेफाली वर्मानं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाही या वयात हे जमलं नव्हतं

Shafali Verma शफालीनं २१ ट्वेंटी-२० सामन्यांत दोन अर्धशतकांसह ५५७ धावा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 2:45 PM

Open in App

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शेफाली वर्मा ( Shafali Verma ) हिनं सोमवारी आयसीसी जागतिक महिला ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीमुळे तिनं पुन्हा एकदा ट्वेंटी-२०तील अव्वल स्थान पटकावलं. १७ वर्षीय शेफाली बिग हिटर फलंदाज आहे. तिच्या याच दमदार कामगिरीमुळे गतवर्षी भारतानं आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला होता. तिनं ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला ( Beth Mooney) हिला मागे टाकले.  सचिन तेंडुलकरची BMW X5M कार पुन्हा विक्रीला; OXLवर उपलब्ध, जाणून घ्या किंमत

दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिझले ली हिला वन डे क्रमवारीतील अव्वल स्थआन गमवावे लागले. इंग्लंडच्या टॅमी बीयूमोंटनं तिला मागे टाकले. ट्वेंटी-२०त ली हिनं ३ स्थानांच्या सुधारणेसह ११वा क्रमांक पटकावला आहे. तिनं ७० धावांची मॅच विनिंग खेळी करून दक्षिण आफ्रिकेला मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली आहे. शफालीनं २१ ट्वेंटी-२० सामन्यांत दोन अर्धशतकांसह ५५७ धावा केल्या आहेत.  टीम इंडियात दोन खेळाडूंचे पदार्पण, पहिली वन डे खेळण्यापूर्वी कृणाल पांड्या झाला Emotional!  शेफाली वर्मानं आफ्रिकेविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे २३ व ४७ धावा केल्या आहेत. तिच्या खात्यात ७५० गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मूनीच्या खात्यात ७४८, तर न्यूझीलंडच्या सोफी डेव्हीनच्या खात्यात ७१६ गुण आहेत आणि ते अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताची स्मृती मानधना ६७७ गुणांसह सातव्या आणि जेमीमा रॉड्रीग्ज ६४० गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. Video : सॉफ्ट सिग्नलचा विराट कोहलीच्या नव्या भिडूला फटका; अफलातून झेल घेऊनही अम्पायरनं दिलं NOT OUT!

गोलंदाजी विभागात इंग्लंडची सोफी एस्लेस्टोन ( ७९९), दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्मैल ( ७७६) आणि इंग्लंडची सराहा ग्लेन ( ७५५) अव्वल तीन क्रमांकावर आहेत. दीप्ती शर्मा ७०० गुणांसह सातव्या आणि राधा यादव ६९४ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीप्ती ( ३०२) चौथ्या क्रमांकावर आहे. 

  

टॅग्स :आयसीसीमहिला टी-२० क्रिकेट