Join us  

शोएब अख्तरने मारली पलटी; म्हणाला, कनेरियाबाबतच्या वक्तव्याच्या विपर्यास करण्यात आला

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते, असा खुलासा केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 3:27 PM

Open in App

मुंबई : पाकिस्तानचा माजी वेवान गोलंदाज शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी दानिश कनेरियाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भरपूर गदारोळ झाला. पण आता, मी असे वक्तव्य केले नव्हते, त्याचा विपर्यास करण्यात आला, असे शोएबने म्हटले आहे.

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते, असा खुलासा केला होता. पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणाºया गोलंदाजांच्या यादीत दानिश चौथ्या क्रमांकावर आहे. दानिश हा पाकिस्तान क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत पाकिस्तान संघाकडून खेळले आहेत.

शोएब म्हणला की, " माझ्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी पाकिस्तान, क्रिकेट संघ किंवा पीसीबीबद्दल काहीच म्हटले नव्हते. मी फक्त संघातील १-२ खेळाडूंच्या वागण्याबद्दल बोललो होतो. मी जे काही बोललो त्यावर ठाम आहे. पण या माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून रान पेटवण्यात आले. त्यामुळे याबाबत मला खुलासा करणे भाग आहे." 

खेळाडूची गुणवत्ता पाहायची असते की जात, हा प्रश्न सध्याच्या घडीला ऐरणीवर आला आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका नेत्याने क्रीडा संघांतही आरक्षण असावे, अशी भूमिका मांडली होती. आता तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शोएब अख्तरने एका मोठा गौप्यस्फोट केला आहे.

खेळाडूची गुणवत्ता पाहायची असते की जात, हा प्रश्न सध्याच्या घडीला ऐरणीवर आला आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका नेत्याने क्रीडा संघांतही आरक्षण असावे, अशी भूमिका मांडली होती. आता तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शोएब अख्तरने एका मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अख्तरने  'गेम ऑन है' या टीव्ही शो मध्ये ही गोष्ट सांगितली. यावेळी पाकिस्तानचे काही माजी क्रिकेटपटूही कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अख्तर म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात बरेच हेवेदावे केले जातात. पाकिस्तानच्या संघात गुणवत्ता आणि कामगिरी या गोष्टींपेक्षाही काही गोष्टी महत्वाचा ठरतात. या गोष्टींसाठी पाकिस्तानचे खेळाडू हाणामारी करायलाही तयार असतात." 

अख्तर पुढे म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात जे खेळाडू मुस्लीम होते, त्यांच्यावर अन्याय केला गेला. युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. तो देवाची देणगीच होता. पण ही देणगी पाकिस्तानच्या संघाला चांगल्यापद्धतीने सांभाळता आली नाही. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला." 

हिंदू क्रिकेटपटूबाबत अख्तर म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात हिंदू खेळाडूही होता. तो हिंदू आहे म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघाल बऱ्याच विकेट्स मिळवून दिल्या. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या, पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंची आग मस्तकात जायची. त्या हिंदू खेळाडूला मारण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूची कारकिर्द अल्पावधीतच आटोपली, नाहीतर त्याने जास्त काळ संघाची सेवा केली असती. हा हिंदू खेळाडू होता दानिश कनेरिया."

टॅग्स :शोएब अख्तरपाकिस्तान