ठळक मुद्देसानिया मिर्झा तिच्या पालकांसोबत हैदराबाद येथे आहे, तर शोएब पाकिस्तानात आहे28 जूनला पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती व पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांची मागील पाच महिन्यांपासून भेट झालेली नाही. दोघांच्या स्पर्धा आणि त्यानंतर जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे शोएब-सानिया यांना वेगवेगळ्या देशांत अडकावे लागले. सानिया आपल्या आई-वडिलांच्या घरी हैदराबाद येथे आहे, तर शोएब त्याच्या घरच्यांसह सिआलकोट, पाकिस्तान येथे आहे. पण, आता या दोघांना भेटता येणार आहे.
पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!
पाकिस्तानचा संघ 28 जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना या दौऱ्यावर नेता येणार नाही. पण, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी शोएबला त्याच्या कुटुंबीयांना म्हणजेच सानिया आणि मुलाग इजहानला भेटण्याची परवानगी पाकिस्तान क्रिकेट मंडळा ( पीसीबी) आणि इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळानं ( ईसीबी) दिली आहे. त्यामुळे शोएब 24 जुलैला इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.
''क्रिकेट स्पर्धा आणि कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर आलेल्या बंदीमुळे शोएब त्याच्या पत्नी व मुलापासून पाच महिन्यांपासून दूर आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वी त्याला सवलत देण्यात आली आहे,''असे पीसीबीचे मुख्य कार्यकारी वसीम खान यांनी सांगितले.
'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक
त्यांनी पुढे सांगितले की,''विमान प्रवासावरील निर्बंध हळुहळू शिथिल होत आहेत आमि त्यामुळे शोएबला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळू शकते. यासंदर्भात आम्ही इंग्लंड क्रिकेट मंडळाशीही चर्चा केली. त्यांनीही मान्यता दिली आहे. शोएब 24 जुलैला इंग्लंडमध्ये दाखल होईल. शोएबला लंडन सरकारचे सर्व नियम पाळावे लागतील.''
दरम्यान, सानियानं पती शोएबशी कधी भेट होईल, याबाबत चिंता व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की,''तो पाकिस्तानात अडकला आहे आणि मी इथे. आम्हाला एक लहान बाळ आहे आणि अशी परिस्थितीला सामोरे जाणं आव्हानात्मक आहे. इजहान कधी त्याच्या वडिलांना भेटेल याची कल्पना नाही.''
सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण
पाकिस्तानचा संघ 28 जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्यांची दोन वेळा कोरोना चाचणी होणार आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. क्वारंटाईन कालावधीत त्यांना सराव करण्याची मूभा देण्यात आली आहे. 30 जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण
बीसीसीआयवर वाढता दबाव; चिनी कंपनींसोबतचे करार संपुष्टात आणा, अन्यथा...
माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम
बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral
चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक
युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो
Web Title: Shoaib Malik - Sania Mirza reunion confirmed! Pak cricketer given clearance for delayed arrival in England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.