आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डोपिंगचा मुद्दा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मिळालेल्या सुट्टीत क्रिकेटपटू सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर बीसीसीआयनं त्यांना आगामी मालिकेपूर्वी २० दिवसांची सुट्टी दिली आहे. याचवेळी श्रीलंकेचा संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे. तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी लंकन संघ येथे दाखल झाला आहे आणि व्हायरल झालेला व्हिडीओ हा श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचा आहे.
Euro 2020 : गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात; ख्रिस्तियानो रोनाल्डोनं केला देशाचा अपमान, Video Viral
यजमान इंग्लंडनं तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. इंग्लंडनं तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आणि मंगळवारपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. शनिवारी इंग्लंड-श्रीलंका मालिकेतील तिसरा ट्वेंटी-२० सामना खेळवण्यात आला. या सामन्यान १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ९१ धावांत तंबूत परतला. जॉनी बेअरस्टो ( ५६), डेवीड मलान ( ७६) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडनं ६ बाद १८० धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात बिनुरा फर्नांडो ( २०) व ओशादा फर्नांडो ( १९) वगळता अन्य फलंदाजांनी पाट्या टाकल्या. डेव्हिड विली ( ३-२७), सॅम कुरन ( २-१४), ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन व लायम लिव्हिंगस्टोन यांच्या प्रत्येकी एक विकेट्सच्या जोरावर इंग्लंडनं बाजी मारली.
या सामन्यानंतर रविवारी श्रीलंकेचे खेळाडू इंग्लंडच्या रस्त्यांवर सिगारेट पिताना दिसले. व्हिडीओत दिसणारे खेळाडू हे कुशल मेंडीस, निरोशन डिकवेला हे असल्याचा दावा केला जात आहे.
पाहा व्हिडीओ..