नवी दिल्ली : युवा प्रतिभावान शुभमन गिल तसेच तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यांना आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौºयासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने बीसीसीआयकडून निलंबनाच्या कारवाईचा सामना करीत असलेले हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांची जागा घेतील.
विजय शंकर पांड्याचा पर्याय असून गिल हा २३ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाºया पाच एकदिवसीय सामन्यांसाठी पहिल्यांदा राष्टÑीय संघात दाखल झाला आहे. एका टीव्ही शो दरम्यान हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना माघारी बोलविले.
१५ जानेवारी रोजी होणाºया एकदिवसीय सामन्याआधी विजय शंकर आॅस्ट्रेलियात दाखल होणार आहे. शुभमन गिल हा न्यूझीलंड दौºयाआधी संघात दाखल होईल. राष्टÑीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यंदाच्या प्रथमश्रेणी स्पर्धेमध्ये शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ नऊ सामन्यात गिलने एक हजार धावा केल्या.
निवड समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला निवडकर्त्यांनी लोकेश राहुलच्या जागी मयांक अग्रवालची निवड केली होती, पण अग्रवालला किरकोळ जखम असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
विजय शंकर याला श्रीलंकेत झालेल्या टी२० निदहास चषकानंतर दुसºयांदा संघात स्थान मिळाले. या अष्टपैलू खेळाडूने न्यीझलंड दौºयात अ संघातून देदिप्यमान कामगिरी केली होती. तो तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. शंकर हा मध्यमगती माराही करतो.
हा विशेष क्षण - गिल
‘आंतरराष्टÑीय कारकीर्दीची सुरुवात न्यूझीलंडमध्ये होत आहे, यापेक्षा मोठी गोष्ट नाही. राष्टÑीय संघात पदार्पण माझ्यासाठी विशेष क्षण आहे,’ प्रतिक्रिया पंजाबच्या शुभमनने दिली. शुभमन १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतत ‘मालिकावीर’ ठरला होता. त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्याचे वृत्त रात्री समजले. यावर तो म्हणाला, ‘माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी वडिलांना ही बातमी दिली. त्यांनी मला कडाडून मिठी मारली.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Shubhaman Gill and Vijay Shankar are the only people who have the opportunity
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.