एका दगडात दोन पक्षी.. श्रीलंकेने केली बांगलादेशची तुफान धुलाई; 'टीम इंडिया'चा विक्रमही मोडला !

Sri Lanka Team India Test Cricket Record, SL vs BAN 2nd Test: चितगावच्या मैदानावर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत मोठा पराक्रम घडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:08 PM2024-04-02T13:08:30+5:302024-04-02T13:11:51+5:30

whatsapp join usJoin us
SL vs Ban 2nd Test Live Updates Sri Lanka breaks Team India of Highest score in single innings without century | एका दगडात दोन पक्षी.. श्रीलंकेने केली बांगलादेशची तुफान धुलाई; 'टीम इंडिया'चा विक्रमही मोडला !

एका दगडात दोन पक्षी.. श्रीलंकेने केली बांगलादेशची तुफान धुलाई; 'टीम इंडिया'चा विक्रमही मोडला !

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sri Lanka breaks Team India record, SL vs BAN 2nd Test: भारतात सध्या IPLचा थरार सुरु आहे. IPL ही जगभरातील T20 मधील सर्वात आव्हानात्मक क्रिकेट स्पर्धा मानली जाते. एकीकडे IPLचा थरार सुरु असताना, दुसरीकडे  श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेच्या संघाने जिंकला आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत आहे. चितगांवच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात ५३१ धावा केल्या. या दमदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा ४८ वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला. नक्की काय आहे हा विक्रम... जाणून घ्या.

श्रीलंकेच्या संघाने बांगलादेश विरूद्ध खेळताना ५०० पार मजल मारली. पण यात अजब गोष्ट अशी घडली की या डावात श्रीलंकेच्या संघातील एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. पण श्रीलंकेने कसोटी क्रिकेटमध्ये शतक न करता एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी या विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. भारताने १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. कानपूरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्स गमावून ५२४ धावा केल्या होत्या. पण त्यात एकाही शतकाचा समावेश नव्हता. श्रीलंकेने हा विक्रम मोडीत काढला असून कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात कोणत्याही खेळाडूने शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या ४ गडी गमावून ३१४ धावा होती, तर दुसऱ्या दिवशी संघाने ५३१ धावांपर्यंतच मजल मारली. एकूण १५९ षटकांच्या डावात श्रीलंकेच्या एकूण ६ खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केल्या. दोन खेळाडूंची शतके थोडक्यात हुकली. कुसल मेंडिस ९३ धावांवर तर कामिंडू मेंडिस ९२ धावांवर नाबाद राहिला पण संघ सर्वबाद झाल्यामुळे त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही.

  • कसोटीच्या एका डावात शतक न करता सर्वाधिक धावा

  1. ५३१ धावा- श्रीलंका विरूद्ध बांगलादेश (वर्ष २०२४)
  2. ५२४ धावा- भारत विरूद्ध न्यूझीलंड (वर्ष १९७६)
  3. ५२० धावा- ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज (वर्ष २००९)
  4. ५१७ धावा- दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया (वर्ष १९९८)
  5. ५०० धावा - पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (वर्ष १९८१)

Web Title: SL vs Ban 2nd Test Live Updates Sri Lanka breaks Team India of Highest score in single innings without century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.