मुंबई - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कॅप्टन कुल म्हणून जेवढा ओळखला जातो, तितकाच माणूस म्हणूनही तो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. धोनी आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे, गर्भश्रीमंत बनला आहे. मात्र, आपला भूतकाळ तो कधीही विसरत नाही. आजही त्याच्यात रांचीतील तो 20-20 वर्षांचा सामान्य मुलगा जिवंत असल्याचं दिसून येतो. धोनीला क्रिकेटसाठी पहिली स्पॉन्सरशीप देणाऱ्या सोमी कोहली यांनी धोनीच्या उदारपणाचा आणि कृतज्ञतेचा तो किस्सा सांगितला.
महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आणि देशावासियांसाठी तो मोठा धक्का होता. मैदान गाजवणाऱ्या धोनीने अशी मैदानाबाहेरुन निवृत्ती घेणे कुणालाही पटले नाही. त्यामुळेच, धोनीसाठी एक सामना आयोजित करण्याची मागणी आजही चाहत्यांकडून होत आहे. धोनीला करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला आहे. अगदी, माहीला पहिली स्पॉन्सरशीप मिळावी म्हणून धोनीचा मित्र परमजीत सिंहने तब्बल 6 महिने BAS या स्पोर्ट्स साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकाशी विनवणी केली. अखेर, 6 महिन्यानंतर BAS ने माहीला पहिली स्पॉन्सरशीप देऊ केली होती. मात्र, आपल्या पडत्या काळात ज्या कंपनीने आपल्यावर विश्वास दाखवला, त्याच कंपनीची निवड धोनीने विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांवेळी वापरलेल्या बॅटसाठी केली.
BAS (Beat-All-Sports) कंपनीने मालक सोमी कोहली यांनी धोनीच्या कृतज्ञतेबाबतचा किस्सा सांगितला. धोनीच्या निवृत्तीच्या बातमीनंतर मला रात्री उशिरापर्यंत झोपच आली नसल्याचं ते म्हणाले. धोनी म्हणजे क्रिकेटमधील जेम असून तो कृतज्ञ असल्याचंही त्यांनी सांगितलं. धोनीला सर्वप्रथम 1998 साली आमच्या कंपनीने स्पॉन्सरशीप दिली होती. विशेष म्हणजे ती स्पॉन्सरशी तब्बल 22 वर्षांपर्यंत कायम राहिल्याचा आम्हाला गर्व आहे. सन 2019 मधील इंग्लंडच्या विश्वचषक सामन्यापूर्वी धोनीने त्याच्या स्पॉन्सरशीप असलेल्या सर्वच कंपन्यांचे लोगो परत केले. आपला करार संपुष्टात आणला. कदाचित हा आपला अखेरचा विश्वचषक असल्याचं धोनीला माहिती होतं.
इंग्लंडमधील विश्वचषकाच्या सामन्यांपूर्वी धोनीने आम्हाला (BAS) कंपनीच्या निळ्या लोगोसंदर्भात विचारणा केली. आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा धोनीचा प्रयत्न होता. इतर दिग्गज कंपन्यांचा लोगो वापरुन तो कोट्यवधी रुपयेही कमाऊ शकला असता. मात्र, धोनीने पहिल्या स्पॉन्सरशीपवाल्या कंपनीच्या लोगोलाच पहिली पसंती दिली. त्यामुळेच, धोनी भारतीय क्रिकेटचा कोहीनूर असल्याचं कोहली यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं.
Web Title: ... so Dhoni 'Kohinoor', the owner who gave the first sponsorship, told 'that' case says
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.