पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं टीमची घोषणा केली. दासून शनाका ( Dasun Shanaka) याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज धनंजय डी सिल्वा याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दासुनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघानं नुकतंच टीम इंडियाविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यात वनिंदु हसरंगा व दुष्मंथा चामीरा यांनाही स्थान मिळाले आहे. या दोघांनी टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत मुख्य भूमिका पार पाडली होती.
महेंद्रसिंग धोनीचं मेंटॉर बनणं टीम इंडियाच्या माजी खेळाडूला नाही आवडलं, म्हणाला...
यूएईत १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. श्रीलंकेचा अ गटात समावेश करण्यात आला असून १८ ऑक्टोबरला ते अबू धाबी येते नामिबिया यांच्याविरुद्ध पहिला सामना खेळतील. हसरंगानं भारताविरुद्धच्या मालिकेत ३ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्यानं आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात स्थान पटकावले आहे. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अॅडम झम्पाच्या जागी हसरंगाला संधी मिळाली आहे.
नोरिशन डिक्वेला, कुशल मेंडीस या स्टार खेळाडूंसह दानुष्का गुणतिलका यांना डच्चू देण्यात आला आहे. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना या तिघांनी कोरोना नियम मोडले आमइ त्यांच्यावर बंदी घातली गेली आहे. कुशल परेरा दुखापतीतून सावरत संघात परतला आहे आणि यष्टिरक्षकाची जबाबदारी मिनोद भानुक यांच्यावर असेल. २१ वर्षीय फिरकीपटू माहीश थीकसाना यालाही संधी मिळाली आहे.