Bangladesh and Sri Lanka 2nd Test : श्रीलंकेने कसोटी क्रिकेटमध्ये भीमपराक्रम नोंदवला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने टीम इंडियाचा १९७६ सालचा विक्रम मोडला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५३१ धावा उभ्या केल्या आणि भारताचा ४८ वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला गेला.
बांगलादेशचे फिल्डर पाकिस्तानपेक्षा अतरंगी निघाले; ३ खेळाडू कॅच पकडण्यात फेल झाले, Video
श्रीलंकेच्या निशान मदुश्का ( ५७), दिमुथ करुणारत्ने ( ८६), कुसल मेंडीस ( ९३), दिनेश चंडीमल ( ५९), कर्णधार धनंजया डी सिल्वा ( ७०) यांनी दमदार कामगिरी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. ६ बाद ४१९ धावांवर जयसूरियाचा झेल बांगलादेशच्या खेळाडूंनी टाकला. पण, त्याला २८ धावाच करता आल्या. कमिंदू मेंडिस एकाबाजूने दमदार फटकेबाजी करत होता. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांना श्रीलंकेचे शेपूट गुंडाळण्यात यश आले. मेंडिस १६७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. त्यांचा पहिला डाव १५९ षटकांत ५३१ धावांवर गडगडला.
कुशल ( ९३) व कमिंदू ( ९२) यांना शतकाने हुकलावणी दिली. कसोटी क्रिकेटमध्ये डावात एकाही फलंदाजाचे शतक पूर्ण न होता एखाद्या संघाने उभ्या केलेल्या सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम नावावर केला. श्रीलंकेच्या ५३१ धावांमध्ये एकाही फलंदाजाचे शतक पूर्ण झालेले नाही. यापूर्वी १९७६ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध ९ बाद ५२४ धावांवर डाव घोषित केला होता. एकाही फलंदाजाचे शतक न होता उभ्या राहिलेल्या या सर्वोत्तम धावा होत्या. पण, हा विक्रम आता श्रीलंकेच्या नावावर झाला आहे.
एकही शतक नाही, तरी संघाच्या सर्वोत्तम धावा
- ५३१ - श्रीलंका वि. बांगलादेश, आज
- ५२४-९ डाव घोषित - भारत वि. न्यूझीलंड, १९७६
- ५२०-७ डाव घोषित - ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, २००९
- ५१७ - दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया, १९९८
- ५००- ८ डाव घोषित - पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, १९८१