कोरोना व्हायरसमुळे जग हादरले आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी जगभरात अनेक जणं एकजूटीनं काम करत आहेत. या व्हायसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगवरही ( आयपीएल ) अनिश्चिततेचं सावट आहे. या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी क्रिकेट मंडळानं पुढाकार घेतला आहे आणि सरकारला कोट्यवधींची मदत केली आहे. पण, ही मदत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) नाही, तर श्रीलंका क्रिकेट मंडळानं केली आहे.
श्रीलंकेलाही कोरोना व्हायरसशी झळ पोहोचली आहे. या व्हायसरशी मुकाबला करण्यासाठी तेथील सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मदतीला श्रीलंका क्रिकेट धावून आले आहेत. त्यांनी सरकारला 1 कोटी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेता आतापर्यंत या व्हायरसमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंका क्रिकेटनं सरकारला मदत करण्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. ''कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकारला 1 कोटींची मदत करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेटने घेतला आहे,'' अशी त्यांनी माहिती दिली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...
Coronavirus : आता आयसीसीचेही ‘वर्क फ्रॉम होम’, अनेक कर्मचारी घरुनच करणार काम
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार
IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान