Join us  

श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा मात्र अधांतरी

श्रीलंका संघाने निवडलेल्या संघातून दहा प्रमुख खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतल्याने हा प्रस्तावित दौरा अधांतरी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:07 AM

Open in App

कराची : अनुभवी फलंदाज उमर अकमल आणि अहमद शहजाद यांना पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध आगामी वन डे मालिकेसाठी संघात पाचारण केले आहे. पीसीबीचे मुख्य निवडकर्ते आणि कोच मिसबाह उल हक यांनी ही माहिती दिली. श्रीलंका संघाने निवडलेल्या संघातून दहा प्रमुख खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतल्याने हा प्रस्तावित दौरा अधांतरी आहे.दोन्ही फलंदाजांना मागच्या निवड समितीने वन डे विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान दिले नव्हते. ज्येष्ठ खेळाडू मोहम्मद हफिज आणि शोएब मलिक यांना १२ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास पीसीबीकडून परवानगी बहाल करण्यात आल्यामुळे या दोघांचा संभाव्य संघासाठी विचार करण्यात आलेला नाही. श्रीलंकेला या दौऱ्यात २७ सप्टेंबरपासून कराची येथे तीन वन डे आणि त्यानंतर ९ आॅक्टोबरपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. लसिथ मलिंगासह दहा खेळाडूंनी सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करताच लंकेचा पाक दौरा संकटात सापडला आहे.या दौºयासाठी पंच तसेच सामनाधिकारी नियुक्त करण्याआधी आयसीसीमार्फत स्वतंत्र पर्यवेक्षक पाठवून दौºयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्य कोच आणि निवडकर्ते या नात्याने मिसबाह हक यांच्यासाठी ही पहिलीच मालिका असेल. दौºयानिमित्त लाहोर येथे संभाव्य शिबिराचे आयोजन करण्याची सूचना पीसीबीने करताच मिसबाह यांनी युवा वेगवान गोलंदाज मोहममद हसनैन याला सीपीएलमधून संघात पाचारण केले हे विशेष.लंकेविरुद्ध खेळणारा पाकिस्तानचा संभाव्य क्रिकेट संघ:सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, फहीम अशर, अहमद शहजाद,आसिफ अली, फकर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शदाब खान, उमर अकमल, उस्मान शेनवारी आणि वहाब रियाज.

टॅग्स :पाकिस्तानश्रीलंका