कोलंबो - निदाहास चषकात सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 153 धावांचे आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 19 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. सलामीवीर कुसाल मेंडिस यांने 38 चेंडूत 55 धावांची दमदार खेळी केली. याखेळीमध्ये त्यानं तीन चौकार आणि तीन षटकार लगावले.
कुसाल मेंडिसव्यतिरिक्त धनुष्का गुणतिलक (17), उपुल थरंगा (22) दासुन शनाका (19) आणि तिसारा परेरा (15) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. भारताकडून शार्दूल ठाकूरने चार गड्यांना बाद केले.
रोहित शर्मा याने नाणेफेकू जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना प्रत्येकी 19 षटकांचा खेळवण्यात येत आहे. भारताने पंतला आराम देत केएल राहुलला संधी दिली आहे.