श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेहान मदुशंका याला रविवारी श्रीलंकन पोलिसांनी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली. AFP नं दिलेल्या वृत्तानुसार मदुशंका याला दोन आठवड्यांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयानं दिले आहेत. श्रीलंकेतील पन्नाला शहरात त्याला ही अटक करण्यात आली. तिथे तो लॉकडाऊन असूनही एका व्यक्तीसोबत कार चालवताना दिसला.
कोरोना व्हायरसशी जगाप्रमाणे श्रीलंकाही लढा देत आहे. तेथील सरकारनं अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण, तरीही मदुशंका नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत होता. त्याच्याकडे दोन ग्राम हिरोइन सापडले. त्यानं 2018मध्ये बांगलादेशविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला आपली छाप पाडता आली नाही.
त्यानं पहिल्या सामन्यात हॅटट्रिक घेतली, परंतु दुखापतीमुळे त्याला कमबॅक करता आले नाही. त्यानं 2 ट्वेंटी-20 सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या गोष्टी
... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक
उसेन बोल्टवर ब्रिटिश मॉडलचे गंभीर आरोप; प्रेयसी गर्भवती असताना करायचा अश्लील मॅसेज
ईदच्या निमित्तानं इरफान पठाणनं देशवासियांना दिल्या अशा शुभेच्छा, पाहा Video
क्रीडा विश्वात हळहळ! तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारे बलबीर सिंग यांचे निधन
Video : दिव्यांग मुलाची गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क; तुम्हीही पडाल प्रेमात