भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. सोमवारी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. या कपलला 2016मध्ये मुलगी झाली होती आणि तिचं नाव गार्सिया असं ठेवण्यात आले होते. त्यानंतर 2020मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. कोरोना व्हायरसच्या गंभीर वातावरणात या बातमीनं रैनाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली.
कोरोना व्हायरमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सने रैनाच्या कुटुंबीयातील नव्या सदस्याचे स्वागत केले आहे.
सुरेश रैनानं नुकतीच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानं 2018मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता. आगामी आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्यात त्याचा निर्धार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल
IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड
पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल
Web Title: Suresh Raina and his wife Priyanka blessed with a baby boy svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.