नागपूर : श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्यासह तीन माजी क्रिकेटपटूंवर तस्करीचा आरोप करण्यात आला आहे. जयसूर्या आणि अन्य दोन क्रिकेटपटू अवैध रीतीने भारतात खराब सुपा-यांची तस्करी करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह तिघांवर कर चुकवल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.डायरेक्टर आॅफ रेव्हेन्यू इंटेलीजंट्सने नागपूर येथे कोट्यवधी रुपयांच्या सुपा-यांची तस्करी पकडली. या प्रकरणी तपास केला असता जयसूर्याचे नाव समोर आले. पुढील तपासासाठी त्याला मुंबईत रेव्हेन्यू इंटेलीजंट्स पथकासमोर हजर राहण्यास सांगितले असून श्रीलंका सरकारला या प्रकरणी पत्रही पाठविले आहे. अन्य दोन क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत, परंतु त्यांनाही २ डिसेंबरला बोलावण्यात येणार असल्याचे समजते.एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास उप संचालक दिलीप शिवरे करीत आहेत. त्यांनी म्हटले की, ‘कोट्यवधी रुपयांच्या सुपा-या इंडोनेशियातून श्रीलंकामार्गे भारतात आणल्या जात होत्या. त्यासाठी बनावट कंपन्यांची कागदपत्रे दाखविण्यात आली. कर चुकविण्यासाठी या सुपाºया लंकेतून भारतात आणल्याचे दाखविण्यात आले होते.’कर चुकविण्याचा केला प्रयत्नया बनावट कंपन्यांच्या स्थापनेसाठी जयसूर्याने त्याच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सुपाºया इंडोनेशियातून आयात केल्यास त्यावर १०८ टक्के कर लागतो;परंतु श्रीलंकेमार्गे सुपाºया भारतात आणून तो कर चुकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्यावर तस्करीचा आरोप; तीन खेळाडू अडकले वादाच्या भोवऱ्यात
दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्यावर तस्करीचा आरोप; तीन खेळाडू अडकले वादाच्या भोवऱ्यात
श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्यासह तीन माजी क्रिकेटपटूंवर तस्करीचा आरोप करण्यात आला आहे. जयसूर्या आणि अन्य दोन क्रिकेटपटू अवैध रीतीने भारतात खराब सुपा-यांची तस्करी करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:07 AM