मुंबई : भारताने २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी रविवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात बंगालची फलंदाज रिचा घोष एकमेव नवा चेहरा आहे. या व्यतिरिक्त संघात अन्य कुठल्या नव्या चेहºयाचा समावेश नाही.
हरयाणाची १५ वर्षीय शेफाली वर्मा पहिल्या मोसमात आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप सोडण्यात यशस्वी ठरल्यानंतर प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. रिचाला नुकत्याच झालेल्या महिला चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीचा लाभ मिळाला. तिने २६ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या होत्या. महिला निवड समितीची अध्यक्षा हेमलता कालाने पत्रकार परिषदेत सांगितले की,‘गेल्या वर्षभरात आम्ही ५-६ खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. यापूर्वी एकसारखाच संघ खेळला, पण २०१७ एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकनंतर अनेक नव्या खेळाडू आल्या. पाच-सहा नव्या खेळाडू तयार केल्या असून त्या आता भक्कमपणे खेळत आहेत. रिचा घोष नवी खेळाडू आहे आणि येथे निवड समितीची जबाबदारी वाढते.’विश्वचषक टी२० भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी.
तिरंगी मालिका संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी आणि नुजहत परवीन.