शारजा, टी-10 लीग : पखतून्स संघाचा सलामीवीर आंद्रे फ्लेचरने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. फ्लेचरच्या या खेळीच्या जोरावर सिंधीस संघाविरुद्ध खेळताना पखतून्सला 20 षटकांत 6 बाद 137 अशी धावसंख्या उभारता आली.
आंद्रे फ्लेचरने सुरुवातीपासूनच सिंधीसच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. चौकार आणि षटकारांच्या अतिषबाजी करत असताना फ्लेचरला पाच वेळा जीवदान मिळाले आणि या गोष्टीचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. फ्लेचरने फक्त 29 चेंडूंत नाबाद 68 धावा फटकावल्या, या खेळीमध्ये त्याने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले.