ठळक मुद्देजॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे केरळ नाईट्सने बाजी मारलीबंगाल टायगर्सवर सात विकेट्स राखून विजय मिळवलाजॉनीने 24 चेंडूंत नाबाद 84 धावांची धडाकेबाज खेळी
शारजा, टी-10 लीग : जॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे केरळ नाईट्स संघाने शुक्रवारी बंगाल टायगर्सवर सहज विजय मिळवला. सुनील नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्स संघाला केरळ नाईट्स या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 123 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करत असताना जॉनीने दमदार खेळी साकारली आणि केरला संघाने सात विकेट्स आणि 14 चेंडू राखून सोपा विजय मिळवला. जॉनीची नाबाद 84 धावांच्या खेळीने टी-10 लीगमध्ये विक्रम प्रस्थापित केला.
धावांचा पाठलाग करताना नाइट्स संघाची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. पण जॉनीने 24 चेंडूंत सहा चौकार आणि आठ षटाकारांच्या मदतीने नाबाद 84 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. जॉनीच्या या खेळीच्या जोरावर केरलाने बंगालवर मात केली. जॉनीची ही खेळी टी-10 लीगमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने नॉर्दर्न वॉरियर्सच्या निकोलस पूरणचा 77 धावांचा विक्रम मोडला.
बंगाल टायगर्सचा सलामीवीर सुनील नरीनने अर्धशतक झळकावले. नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्सने 123 धावा केल्या. केरळ संघाने नाणेफेक जिंकून बंगालच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या संधीचा नरीनने चांगलाच फायदा उचलला. नरीनने 25 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकार यांच्या मदतीने 52 धावा केल्या. नरीनला यावेळी शेरफन रुदरफोर्डने 17 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.
Web Title: T10 League: Johnny Bairstow creat record, highest individual score in T10League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.