Join us  

T10 League: बाद फेरीत पोहोचण्याची संघांना अखेरची संधी

पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे नेमके कोणते संघ बाद फेरीत पोहोचतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 4:46 PM

Open in App
ठळक मुद्देसध्याच्या घडीला पखतून्स आणि नॉर्दन वॉरियर्स या दोन्ही संघांचे समान 8 गुण आहेत.पण चांगला रनरेट असल्यामुळे वॉरियर्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे.पखतून्स हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

शारजा, टी-10 लीग : सध्याच चांगलीच रंगात आलेली टी-10 लीग ही निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. आज सर्व संघांचे अखेरचे साखळी सामने होणार आहेत. त्यानंतर कोणते संघ बाद फेरीत पोहोचतील, हे चाहत्यांना समजू शकणार आहे.

सध्याच्या घडीला पखतून्स आणि नॉर्दन वॉरियर्स या दोन्ही संघांचे समान 8 गुण आहेत. पण चांगला रनरेट असल्यामुळे वॉरियर्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याचबरोबर पखतून्स हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे आठ गुण असल्याने त्यांचे बाद फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित समजले जात आहे. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे नेमके कोणते संघ बाद फेरीत पोहोचतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गुणतालिकेत बंगाल टायगर्स आणि पंजाबी लिजंट्स या दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. पण चांगला रनरेट असल्यामुळे बंगालचा संघ तिसऱ्या आणि लिजंट्सचा संघ चौथ्या स्थानी आहे. या यादीत राजपूत संघाचे पाच गुण आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहेत. या यादीत सहाव्या स्थानावर सहा गुणांसह मराठा अरेबियन्स हा संघ आहे. गुणतालिकेत केरला नाईट्स सातव्या आणि सिंधीज आठव्या स्थानावर असून त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. 

टॅग्स :टी-10 लीग