शारजा, टी-10 लीग : प्रवीण तांबेच्या पाच बळींच्या जोरावर सिंधीस संघाने केरला किंग्ज संघावर 9 विकेट्स राखून सहज विजय मिळवला.
पार्नेलच्या या खेळीच्या जोरावर किंग्ज संघाने दहा षटकांमध्ये 7 बाद 103 अशी मजल मारली होती. सिंधीज संघाने किंग्ज संघाचे 104 धावांचे आव्हान फक्त एक फलंदाज गमावून पूर्ण केले. या लीगमध्ये प्रथमच पाच बळी मिळवण्याचा मान पटकावणाऱ्या प्रवीणला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
केरला किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रवीणने किंग्ज संघाचा निर्णय पहिल्याच षटकात चुकीचा ठरवला आहे. ख्रिस गेलसारख्या फलंदाजाला दुसऱ्याच चेंडूवर बाद करण्याचा पराक्रम सिंधीस संघातील मुंबईकर प्रवीण तांबेने केली आहे. पहिल्याच षटकात प्रवीणने हॅट्ट्रिकसह चार फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
प्रवीणने दुसऱ्याच चेंडूवर गेलचा काटा काढला, यावेळी गेलला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर चौथ्या चेंडूवर प्रवीणने इऑन मॉर्गनला बाद केले. पाचव्या चेंडूवर कायरन पोलार्डचा काटा प्रवीणने काढला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर फॅबियन अॅलेनचा काटा काढत प्रवीणने हॅट्ट्रिक साजरी केली. मुख्य म्हणजे या चारही फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे पहिल्या षटकात सिंधीस केरला किंग्ज संघाची 4 बाद 6 अशी दयनीय अवस्था होती.
पण किंग्जच्या वेन पार्नेलने 24 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 59 धावांची खेळी साकारली. पार्नेलच्या या खेळीच्या जोरावर किंग्ज संघाने दहा षटकांमध्ये 7 बाद 103 अशी मजल मारली होती.
सिंधीज संघाने किंग्ज संघाचे 104 धावांचे आव्हान फक्त एक फलंदाज गमावून पूर्ण केले. सिंधीज संघाकडून कर्णधार शेन वॉटसनने 24 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद 50 धावांची खेळी साकारली. सिंधीजच्या अँटॉन डेव्हकिचने 20 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या मदतीने 49 धावांची धडाकेबाज खेळी केली.
सामनावीर प्रवीण तांबे काय म्हणाला, पाहा हा व्हीडीओ