नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंचने विश्वविक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीमध्ये फिंचने 172 धावांची तुफानी खेळी साकारत विश्वविक्रम रचला आहे.फिंचने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात फक्त 76 चेंडूमध्ये 16 चौकार आणि 10 षटकार लगावत 176 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील ही सर्वाधिक धावांची खेळी आहे. यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम फिंचच्याच नावावर होता. यापूर्वी फिंचने 29 ऑगस्ट 2013 या दिवशी 156 धावांची खेळी साकारली होती. फिंचच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 229 अशी मजल मारली आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये दोनदा दीडशे धावांचा टप्पा ओलांडणारा फिंच हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ९ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १०० धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.