West Indies Team For T20 World Cup 2024 : यजमान वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून कसोटीमध्ये पदार्पण करून सामना गाजवणाऱ्या शामर जोसेफला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. तर, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला मुकलेल्या शिमरॉन हेटमायरला देखील संधी मिळाली आहे.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्यांशिवाय काही नव्या चेहऱ्यांना विडिंजच्या संघात स्थान मिळाले आहे. अकिल हुसैन आणि गुडाकेश मोती यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. विश्वचषक खेळणाऱ्या २० संघांचे चार गटात विभाजन करण्यात आले आहे. २०१२ आणि २०१६ चा चॅम्पियन कॅरेबियन संघ क गटात असून, यामध्ये अफगाणिस्तान, न्यूझीलंड, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे.
विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्लेस, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकिल हुसैन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, Sherfane Rutherford आणि रोमॅरियो शेफर्ड.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ