Join us  

आयसीसी क्रमवारी टीम इंडिया ‘टॉपर’, कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही अव्वल

आॅस्ट्रेलियाविरुध्दचा सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान मिळवले. या शानदार विजयानंतर भारतीय संघाचे गुण १२० झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:53 AM

Open in App

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुध्दचा सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान मिळवले. या शानदार विजयानंतर भारतीय संघाचे गुण १२० झाले. याआधी कोलकाता येथे झालेल्या दुसºया एकदिवसीय सामन्यात बाजी मारल्यानंतर भारत व दक्षिण आफ्रिका यांचे प्रत्येकी ११९ गुण झाले होते. परंतु, दशांश गुणांच्या जोरावर आफ्रिकेने आघाडी घेतली होती.इंदूर येथील झालेला सामना जिंकून भारताने आता अधिकृतरीत्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे. त्याचबरोबर या शानदार कामगिरीसह भारतीय संघ आता कसोटीसह एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान, मालिका संपल्यानंतर आयसीसी नवी क्रमवारी जाहीर करते. सध्या सुरु असलेल्या आॅस्टेÑलियाविरुध्दच्या मालिकेतील आणखी दोन सामने शिल्लक असून आपले अव्वल स्थान आणखी भक्कम करण्यासाठी भारताला आॅस्टेÑलियाविरुद्ध किमान एक विजय आवश्यक आहे. जर, का हा विजय मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला, तर त्यांचे अग्रस्थान फारवेळ टिकणार नाही.भारताने अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर दक्षिण आफ्रिका द्वितीय स्थानी आला असून त्यांचे ११९ गुण आहेत. त्याचवेळी, आॅस्टेÑलियाची (११४) तिसºया स्थानी घसरण झाली असून इंग्लंड (११३) चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंड १११ गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान आहेत. (वृत्तसंस्था)टीम इंडियाकडे नामी संधी...जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारताकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान पटकावण्याची नामी संधी आहे. आॅस्टेÑलियाविरुध्द सुरु असलेल्या मालिकेनंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धही मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही संघाविरुद्ध टी२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखल्यास टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी येण्याचा पराक्रम करेल.

टॅग्स :क्रिकेट