- सौरव गांगुली लिहितात...
गुवाहाटीत ‘रोहित-विराट शो’ पहायला मिळाला. वेस्ट इंडिजविरुद्ध अन्य सामन्यात हाच पॅटर्न अनुभवायला मिळेल, असा माझा विश्वास आहे. भारताची भक्कम फलंदाजी विरुद्ध विंडीजचा कमकुवत मारा अशी ही स्पर्धा असल्याने विशाखापट्टणम येथे धावांचा पाऊस पडताना पाहणे नवलाईचे ठरणार नाही.
फलकावर ३०० वर धावा पाहणाऱ्यांना विंडीज भारताला झुंजवेल, असा समज झाला असावा. त्यात शिखर धवन लवकर बाद झाला होता. पण विराट-रोहित यांनी पाहुण्यांचा मारा बोथट ठरविला. दोघांचे काही फटके तर श्वास रोखून धरणारे होते. खेळपट्टी अशी होती की चेंडू बॅटवर सहजपणे येत होता. वन डेतील दोन ‘वर्ल्डक्लास’ खेळाडू खेळपट्टीवर असतील, तर चाहत्यांना मेजवानी मिळणारच.
विंडीजच्या गोलंदाजांना विराट आणि रोहितच्या फटक्यांमधील विश्वासार्हता पहायला मिळाली असणार. यामुळेच रोहितला आता कसोटीत खेळविण्याचे औदार्य निवडकर्त्यांनी दाखवायला हवे. रोहित मानसिकदृष्ट्या कणखर बनला असून त्याच्या फटक्यातील वेगही कमालीचा असतो. हे दोन फलंदाज खेळपट्टीवर असतील तर एकहाती विजय मिळवून देऊ शकतात.
विराट-रोहितच्या वर्चस्वपूर्ण खेळामुळे इतर फलंदाजांना फारशी संधी मिळाली नाही. रायुडूला चौथ्या स्थानावर खेळवायचे असल्याने व्यवस्थापन त्याच्या कौशल्याला संधी कशी उपलब्ध करून देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१९ च्या विश्वचषकास अद्याप वेळ असल्याने काही खेळाडूंचे कौशल्य तपासून पाहण्याची हीच वेळ आहे. लोकेश राहुल हा त्यापैकीच एक असेल.
वेस्ट इंडिज संघाबाबत सांगायचे तर त्यांच्यासाठी अंतिम संघ निवडही तापदायक आहे. एविन लेविस, कीरोन पोलार्ड, डेरेन ब्राव्हो, आंद्रे रसेल हे मातब्बर खेळाडू वन डे संघात का नाहीत? शिमरोन हेटमायर चांगला खेळाडू वाटतो पण वरील नावांचा भरणा असता तर भारताला तगडे आव्हान देणारा विंडीजचा वन डे संघ उभा राहू शकला असता. हे खेळाडू केवळ टी-२० त चांगले आहेत मग वन डेत का नाही. त्यांचे निवडकर्तेच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील. (गेमप्लान)
>विंडीज संघ कमजोर
प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्याचा भारत दौºयावर आलेल्या वेस्ट इंडिजचा संघ कसोटी क्रिकेटच्या स्तराचा संघ नाहीच. हा संघ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठीच चांगला आहे. यजमान भारतीय संघावर दडपण आणण्याची साधी कुवतही या संघामध्ये नाही.
Web Title: There will be rain in Visakhapatnam!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.