इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) अखेर टायटल स्पॉन्सर सापडला. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या मोसमाची टायटल स्पॉन्सरशिप Dream 11ने मिळवले. भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपवरून माघार घेतली. आता ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशिप नावावर केली. पण, ड्रीम 11मध्ये चिनी कंपनीच्या गुंतवणूकीवरून नवा वाद सुरू झाला आहे. CAIT या व्यापारी संघटनेनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) पत्र लिहून ड्रीम 11वर आक्षेप नोंदवला आहे.
... हा तर ठाकरे सरकारला जबरदस्त झटका; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. यंदाच्या वर्षासाठीच्या टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत ड्रीम 11, टाटा सन्स, बायजू आणि अनअकॅडमी यांच्यात चुरस रंगली होती.
स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ड्रीम 11ने बाजी मारली. ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.
पण, ड्रीम 11चं चायनीज कनेक्शन आहे. त्यांच्या कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. Tencent ही चायनीज कंपनी आहे. जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी म्हणून Tencentची ओळख आहे आणि त्यांची ड्रीम 11मध्ये 10 टक्के भागीदारी आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.
अखिल भारतीय व्यापारी महासंघानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की,''आयपीएल 2020च्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11ची निवड झाल्यानं आम्हाला वेदना झाल्या. या कंपनीत चीनी कंपनी Tencent Globalची गुंतवणूक आहे. भारतीयांच्या भावनांचा अनादर करून अशा प्रकारे एखाद्या कंपनीला प्रायोजकत्व देणं, याला आमचा विरोध आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?
CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच
"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"
महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ
IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू