मुंबई : भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज अंबाती रायुडूनं बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. 2015 व 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी हुकल्यामुळे आणि पुढचा वर्ल्ड कप खेळण्याची संधी नसल्यानं रायुडूनं हा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. पण, रायुडूला 'ते' एक ट्विट महागात पडलं आणि त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लावाला लागला.अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे. त्यामुळेच धवन व शंकर माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले.
33 वर्षीय रायुडूनं 55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. त्यानंतर त्यानं 3D ट्विट केलं होतं आणि ते त्याचं अखेरचं ट्विट होतं. त्यानंतर बीसीसीआयनंही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच रायुडूला निवृत्ती घेणं भाग पडलं असावी, अशी चर्चा आहे.
काय होतं ते ट्विट...
नाराज अंबाती रायुडू निवृत्त, 'या' देशानं दिली क्रिकेट खेळण्याची ऑफरआइसलँड संघाने त्याला ऑफर दिली आहे.''अंबाती रायुडूनं त्याचं 3D ग्लास आता तरी बाजूला ठेवायला हवा. आम्ही तयार केलेले कागदपत्र वाचण्यासाठी त्याला साधारण चष्माही पुरेसा आहे. आमच्या संघाकडून खेळ,'' असे आइसलँड क्रिकेटनं ट्विट केलं.
रहाणे, रायुडूच्या नावाचा विचार झाला, पण मयांकने बाजी मारली...कारण ? लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दुखापतग्रस्त झाल्यामुळे विजय शंकरला वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मयांक अगरवालचे नाव समोर आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विजयच्या जागी अंबाती रायुडू किंवा अजिंक्य रहाणे यापैकी एक नाव समोर येणं अपेक्षित होतं. पण मयांकचं नाव आलं.. मयांकची निवड का?
"मयांकने गतवर्षी भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे पॉवरप्ले मध्ये कशी फटकेबाजी करायची आणि फिरकीचा सामना कसा करायचा हे त्याला माहित आहे. राहुल द्रविडनेही त्याचे कौतुक केले होते आणि त्याचा विचार करण्यात आला. रहाणे मधल्या फळीत अडकला आहे आणि फिरकीचा सामना करताना तो अडखळतो. रायुडूची कामगिरी निराशाजनक झालेली आहे," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.