आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) मार्ग मोकळा झाला. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) क्रिकेट बोर्डानंही लीग खेळण्यासाठी तयारी दर्शवली आहे. आता फक्त केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे आणि रविवारी होणाऱ्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत त्याबाबतची घोषणा करण्यात येईल. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचा 13 वा मोसम सुरू होणार असल्याची घोषणा गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी केली होती. पण, यूएई सुरक्षित नाही, त्यामुळे आयपीएल भारतातच खेळवा, अशी मागणी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे करण्यात आली आहे. (conduct the IPL 2020 in India and not the UAE)
दंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद!
IPL 2020साठी विराट कोहली तयारीला लागला, शेअर केला फोटो
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणा संदर्भात याचिका दाखल करणारे आदित्य वर्मा यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी यूएई सुरक्षित का नाही, हेही पटवून दिलं आहे. ते म्हणाले,''दुबई रग्बी सेव्हन ही मोठी स्पर्धा यूएईत होणार होती आणि ती कोरोना व्हायरसच्या संकटामुळे नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली. मग आपण आयपीएल यूएईमध्ये का खेळवत आहोत? मी गांगुलीला यासंदर्भात पत्र लिहिलं आहे आणि आयपीएल भारतातच खेळवण्याची विनंती त्यांना केली आहे.'' (conduct the IPL 2020 in India and not the UAE)
भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 17 लाख 30,295 इतका झाला असून 33241 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 11 लाख 26,825 रुग्ण बरे झाले आहेत. असे असतानाही वर्मा यांनी आयपीएल मुंबईत खेळवण्याची मागणी केली आहे. मुंबईत जैव बबल तयार केले जाऊ शकते आणि यूएईच्या तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर सामने खेळवण्यापेक्षा मुंबईत खेळवणं सोयीचे ठरेल, असेही ते म्हणाले. (conduct the IPL 2020 in India and not the UAE)
परदेशी खेळाडूंना दुबईत दाखल होणं, मुंबईच्या तुलनेत सोयीचे आहे. त्यावर वर्मा यांनी सांगितले की,''आयपीएलमध्ये 60पेक्षा अधिक परदेशी खेळाडू खेळणार आहेत. जर त्यांची येण्याची तयारी नसेल, तर त्यांच्याजागी भारतीय खेळाडूंना संधी द्या.'' बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुढे म्हणाले,''आयपीएल भारतात झाल्यास कोरोना व्हायरसमुळे नैराश्याच्या छायेत गेलेल्या भारतीयांचा मूड बदलण्यात मदत होईल. या संकाट भारतात आयपीएल यशस्वीपणे आयोजित केल्यास, ती मोठी गोष्ट असेल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल
पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय?
So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल
इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!
MS Dhoniचे अच्छे दिन संपले, तो पहिल्यासारखा फिट नाही; माजी निवड समिती सदस्यानं दिला सल्ला
हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी म्हणाला...
Good News : टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार बनला बाबा
Web Title: UAE not safe, conduct the IPL 2020 in India; Aditya Verma, has requested BCCI president Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.