Join us  

वेलोसिटीची थरारक विजयी सलामी, सुषमा वर्मा, सुन लूसची निर्णायक फटकेबाजी

सुपरनोव्हाजचा निसटता पराभव ; सुषमा वर्मा, सुन लूस यांची निर्णायक फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 11:15 PM

Open in App
ठळक मुद्देसुषमाने ३३ चेंडूंत ३४ धावा केल्या, तर लूसने २१ चेंडूंत नाबाद ३७ धावांचा तडाखा दिला. धडाकेबाज शेफाली वर्माला आक्रमक सुरुवातीचा फायदा घेता आला नाही.

शारजाह : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात वेलोसिटी संघाने महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेत विजयी सलामी देताना सुपरनोव्हाजचा ५ विकेट्सने थरारक पराभव केला. सुषमा वर्मा व सुन लूस यांची फटकेबाजी वेलिसिटीसाठी निर्णायक ठरली. सुपरनोव्हाजला ८ बाद १२६ धावांवर रोखल्यानंतर वेलिसिटीची ४ बाद ६५ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र सुषमा आणि लूस यांनी ५१ धावांची निर्णयाक भागीदारी करत सुपरनोव्हाजच्या हातून सामना खेचला. वेलोसिटीने १९.५ षटकांत ५ बाद १२९ धावा केल्या.

सुषमाने ३३ चेंडूंत ३४ धावा केल्या, तर लूसने २१ चेंडूंत नाबाद ३७ धावांचा तडाखा दिला. धडाकेबाज शेफाली वर्माला आक्रमक सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. तसेच डॅनियल वॅट आणि कर्णधारी मिताली राज अपयशी ठरल्याने वेलोसिटी दडपणाखाली होते. त्याआधी,  सावध परंतु भक्कम सुरुवात केलेल्या सुपरनोव्हाजने समाधनकारक धावांची मजल मारली. सलामीवीर चमारी अटापट्टूने ३९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही २७ चेंडूंत ३१ धावा फटकावल्या. या दोघींचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. एकता बिष्टने ३ बळी घेत जबरदस्त मारा केला. त्याआधी जहानरा आलम आणि मेघ कास्पेरेक यांनी प्रमुख फलंदाजांना बाद करत सुपरनोव्हाजचे कंबरडे मोडले. १७व्या षटकापासून सुपरनोव्हाजने १५ धावांत ५ बळी गमावले आणि याचा त्यांना मोठा फटका बसला.

टॅग्स :आयपीएलमहिला टी-२० क्रिकेट