वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश मागे टाकून पाकिस्तानला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. १४ डिसेंबरला पहिली कसोटी लढत होणार आहे, परंतु त्याआधी पाकिस्तान एकादश विरुद्ध अध्यक्षीय एकादश यांच्यात सराव सामना सुरू झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम ( Babar Azam ) हा आपण फलंदाजी करतोय हेच विसरला. नॉन स्ट्राईकवर उभा असलेला बाबर त्याच्याच सहकाऱ्याने मारलेला चेंडू अडवायला गेला. त्यामुळे सोशल मीडियावर नेटिझन्सचा मजेशीर खुराक मिळाला आहे.
पाकिस्तानचा संघ या दौऱ्यावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार शान मसूदने फ्रंट फूटवर खेळलेला चेंडू नॉन स्ट्राईकवर उभा असलेला बाबर तो चेंडू अडवायला गेला. तो बॅटिंग टीममध्ये आहे हेच तो विसरला आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८० षटकांत ५ बाद २८७ धावा केल्या आहेत. अब्दुला शफिक ( ३८) व इमाम उल हक ( ९) लवकर बाद झाल्यानंतर शान मसूद व बाबर यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर ८८ चेंडूंत ४० धावा करून माघारी परतला. त्यानंतर सौद शकील ( १३) व सर्फराज अहमज ( ४१) हेही बाद झाले. शान मसूदने २१२ चेंडूंत १३७ धावांची नाबाद खेळी केली आहे.