VIDEO- बॅटिंग करताना विराटने दिली शिवी, स्टम्पवरील माइकमध्ये झाली रेकॉर्ड

दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान वापरलेल्या शब्दामुळे कॅप्टन कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 09:20 AM2018-01-15T09:20:24+5:302018-01-15T10:35:20+5:30

whatsapp join usJoin us
VIDEO- captain virat kohli caught using abusive word, recorded in stump mic | VIDEO- बॅटिंग करताना विराटने दिली शिवी, स्टम्पवरील माइकमध्ये झाली रेकॉर्ड

VIDEO- बॅटिंग करताना विराटने दिली शिवी, स्टम्पवरील माइकमध्ये झाली रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची बॅटिंग स्टाईल व ग्राऊंडवरील त्याचं अग्रेशन सगळ्यांच्याच चांगलं परिचयाचं आहे. सेंच्युरियन येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान वापरलेल्या शब्दामुळे कॅप्टन कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मॅचच्या दरम्यान विराटने वापरलेल्या शब्दामुळे त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. 

रविवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर भारताकडून मुरली विजय आणि के.एल राहुल बॅटिंगला मैदानात उतरले. ही जोडी सुरूवातीला भारतासाठी चांगला स्कोअर करायला अयशस्वी ठरली. के.एल राहुल 10 रन्स करून स्वस्तात बाद झाला. राहुलनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पण एकही रन न करता पुजाराही तंबूत परतला. यावेळी भारताचा स्कोअर 9.4 ओव्हरमध्ये 28/2 इतका होता. यानंतर मुरली विजयची साथ द्यायला कॅप्टन विराट कोहली मैदानात आला. दोन्ही खेळाडूंनी मॅचवर पकड मजबूत करत 28 ओव्हरमध्ये 80 रन्स बनवले. याच दरम्यान विराट कोहलीने मुरली विजयशी हिंदीमध्ये बोलत म्हणाला, “बहुत बढ़िया, अगर शाम तक खेलेंगे तो इनकी …… फट जाएगी।”

विराट कोहलीने मैदानात अतिशय अपमानास्पद शब्द वापरला. विराटचा हा शब्द स्टम्पवर असलेल्या माइकमध्ये रेकॉर्ड झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराटने दिलेली शिवी स्पष्टपणे ऐकायला येते आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरूद्धची ही मॅच जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण टीम इंडियाने एकदाही यजमान संघाचा टेस्ट सिरिजमध्ये पराभव केलेला नाही. 



 

Web Title: VIDEO- captain virat kohli caught using abusive word, recorded in stump mic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.