अन्य खेळाडूंप्रमाणे टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा घरी राहावं लागल्यामुळे कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण एंजॉय करत आहे. कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना घरी राहण्याचेच आवाहन केले आहे. त्यात सर्व क्रिकेट स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) तात्पुरती 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंकडे कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी भरपूर वेळ आहे.
कोरोना व्हायरसचे सध्या जगभरात 3 लाख 38,724 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 99, 003 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14,687 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात कर्फ्यूचं वातावरण आहे. त्यामुळे घरात राहूनच बरेच क्रिकेटपटू आपल्या मुलांसोबत खेळत आहेत. रोहित आणि त्याची कन्या समायरा यांचाही असाच व्हिडीओ समोर आला आहे. रोहित आणि समायरा यांच्यात इनडोअर क्रिकेट सामना रंगताना आपल्याला या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल
IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड
पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल
Good News : सुरेश रैनाच्या घरी पाळणा हलला, पुत्ररत्न प्राप्ती झाली