मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपल्या संघाला टॉप फोरमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स पाच सामन्यांत तीन विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला बुधवारी वानखेडे स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान पेलावे लागणार आहे. पंजाबचा संघ चार विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे रोहितच्या संघाला त्यांना नमवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. या सामन्यात रोहितचे मनोबल उंचावण्यासाठी त्याची मुलगी समायराही नक्की येणार आहे. आयपीएलच्या काही सामन्यात समायरा आई रितिका सजदेहसोबत स्टेडियममध्ये दिसली होती. पण, या सामन्यापूर्वी समायराही अभ्यासात गुंग झाली आहे. तीन महिन्याची समायरा चक्क स्पॅनिश शिकत आहे. रोहितने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ...
MI च्या सराव सत्रात रोहित शर्माला दुखापत, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ तणावातमुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला. पण, या सरावात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना रोहितला झालेली दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे. सराव सत्रात रोहितला दुखापत झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.