पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी नेहमीच भारतीय खेळाडूंसोबत पंगा घेताना दिसला आहे. विशेषतः टीम इंडियाचा माजी सलामीवर गौतम गंभीर आणि त्याच्यातील द्वंद्व अनेकदा अनुभवले आहेत. पण, दुसरीकडे हाच आफ्रिदी समाजसेवेतही मागे नाही. पाकिस्तानात त्याची संस्था गरजवंताना मदत करते आणि सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आफ्रिदी मदतीसाठी पुढे सरसावला आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. त्याची झळ पाकिस्तानलाही पोहोचली आहे, त्यामुळे गरजुंच्या मदतीसाठी आफ्रिदीनं पुढाकार घेतला आहे.
कोरोनामुळे पाकिस्तान सुपर लीगचे प्ले ऑफचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच तेथील दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक गरीबांना मोठी झळ पोहोचत आले. त्यामुळे त्यांना दैनंदिन धान्य पुरवण्यासाठी आफ्रिदी पुढे सरसावला आहे. त्यानं इतरांनाही आवाहन केले आहे.
पाहा व्हिडीओ...
'तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित', शाहिद आफ्रिदीचं पाकिस्तानी नागरिकांना आवाहन
''आरोग्य हीच संपत्ती आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे लागेल. शिंकताना, खोकताना रुमालाचा किंवा टीशू पेपरचा वापर करण्याची गरज आहे. टीशू पेपरचा वापर झाल्यानंतर तो इतरत्र न फेकता कचऱ्याच्या डब्ब्यात टाकावा. जेवण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ पाण्यानं नीट धुवावे. जर तुम्ही सुरक्षित, तर देश सुरक्षित,''असे आफ्रिदी म्हणाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल
IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड
पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल
Good News : सुरेश रैनाच्या घरी पाळणा हलला, पुत्ररत्न प्राप्ती झाली
Video : रोहित शर्माचा कन्येसोबत रंगला क्रिकेट सामना, पाहा कोण जिंकलं