India Tour of England : विराट कोहली टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंपासून झाला वेगळा क्वारंटाईन; समोर आले महत्त्वाचे वृत्त

India Tour of England : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि त्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 03:18 PM2021-05-25T15:18:18+5:302021-05-25T15:19:15+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli and other Mumbai boys to be quarantined separately for 7 days inside BCCI bio-bubble: Report | India Tour of England : विराट कोहली टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंपासून झाला वेगळा क्वारंटाईन; समोर आले महत्त्वाचे वृत्त

India Tour of England : विराट कोहली टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंपासून झाला वेगळा क्वारंटाईन; समोर आले महत्त्वाचे वृत्त

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि त्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल १८ ते २३ जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर सहा आठवड्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह ( Virat Kohli) मुंबईच्या अन्य खेळाडूंना संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळं क्वारंटाईन केलं गेलं आहे. मोठी बातमी : IPL 2021चे उर्वरित सामने खेळवण्याच्या BCCIच्या प्रयत्नांना धक्का; इंग्लंडहून आले महत्त्वाचे अपडेट्स!

या दौरा यशस्वी करण्यासाठी बीसीसीआय खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या दृष्टीने त्यांनी गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. विराट कोहली व मुंबईचे अन्य खेळाडू सोमवारी बीसीसीआयच्या बायो-बबलमध्ये दाखल झाले. हे सर्व सात दिवसांचं क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून संघातील अन्य खेळाडूंसोबत जोडतील. मुंबईव्यतिरिक्त टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी १९ मेपासून सुरू झाला आहे. त्याचमुळे बीसीसीआयनं कोहली व मुंबईच्या अन्य खेळाडूंना इतर सहकाऱ्यांसह वेगळं क्वारंटाईन केलं आहे. कोहली व अन्य खेळाडूंना त्यांची ट्रेनिंग उपकरणं रुममध्ये देतील.  पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणाऱ्या टीम इंडियातील सर्व सदस्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये दिला जाणार आहे. आता सध्या भारतीय खेळाडूंची दररोज कोरोना चाचणी केली जात आहे. भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचल्यानंतर १० दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारत-इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम ( ४ ते ८ ऑगस्ट), लॉर्ड्स ( १२ ते १६ ऑगस्ट), लीड्स ( २५ ते २९ ऑगस्ट), ओव्हल ( २ ते ६ सप्टेंबर) आणि मँचेस्टर ( १० ते १४ सप्टेंबर) असे पाच कसोटी सामने होणार आहेत. 
 

Web Title: Virat Kohli and other Mumbai boys to be quarantined separately for 7 days inside BCCI bio-bubble: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.