मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे बरेच विश्वविक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांचा विश्वविक्रमही सचिनच्याच नावावर आहे. पण विश्वविक्रम मोडीत निघू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नला वाटते. याबाबतची भविष्यॉवाणीही वॉर्नने केली आहे. वॉर्नच्या मते क्रिकेट विश्वातील एक फलंदाज सचिनचा हा विक्रम मोडी काढू शकतो.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके झळकावली होती. यामध्ये 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय शतकांचा समावेश आहे. एका खास मुलाखतीमध्ये वॉर्नला सचिनच्या शंभर शतकांच्या विक्रमाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडीत निघू शकतो, असे वॉर्न म्हणाला. वॉर्न फक्त एवढ्यावर थांबला नाही तर सचिनचा हा विश्वविक्रम कोण मोडीत काढणार हेदेखील त्याने यावेळी सांगितले.
वॉर्न यावेळी म्हणाला की, " सचिनने शंभर शतकांचा विश्वविक्रम रचला होता. पण हा विश्वविक्रम मोडीत निघू शकतो आणि तो विराट कोहली मोडीत काढून शकतो. कारण सध्या कोहलीच्या नावावर 68 शतके आहेत आणि तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे सचिनचा शंभर शतकांचा विश्वविक्रम कोहलीच मोडू शकतो."