भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांच्या घरी नुकतेच परीनं जन्म घेतला. पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतला. ११ जानेवारीला त्यांना कन्यारत्न झाली.
विराटनं ट्विट करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली होती. विराटनं ट्विट केलं की,''तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट''
तुला परत मानलं रे ठाकूर; विराट कोहलीनं केलं वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरचे कौतुक
वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ऑसींचा आत्मविश्वास फाजील ठरवला. या दोघांनी ७व्या विकेटसाठी विक्रमी १२३ धावांची भागीदारी केली. या दोघांचे कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) कौतुक केलं.