Join us  

Virat Kohli AB De Villiers, IPL 2022: विराटचा कोहलीचा 'भिडू' डीव्हिलियर्स RCB साठी नव्या भूमिकेत? 'हा' खेळाडू बनू शकतो कर्णधार

विराटने गेल्या वर्षीचा हंगाम संपल्यावर सोडलं कर्णधारपद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 4:04 PM

Open in App

Virat Kohli AB De Villiers: IPL 2022 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ मार्चला महत्त्वाची घोषणा करणार आहे. या तारखेला RCBच्या नव्या कर्णधाराचं नाव चाहत्यांना समजणार आहे. विराट कोहलीने IPL 2021च्या हंगामानंतर संघाचं कर्णधारपद सोडलं. तेव्हापासून विराटचा वारसदार कोण असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. त्या चर्चांना १२ मार्चला पूर्णविराम मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे तो संघाचा भाग नसेल असं बोललं जात होतं. पण आता एक नवी माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा MR. 360 म्हणजेच एबी डीव्हिलियर्स हा यंदाच्या हंगामात RCB संघाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून संघात सामील होऊ शकतो असं बोललं जात आहे. आपल्या निवृत्तीच्या वेळी डिव्हिलियर्सने जाहीर केलं होतं की तो आता लीग स्पर्धांमध्ये खेळणार नाही, पण कोणत्या ना कोणत्या रूपात तो RCBशी संघाशी जोडलेला असेल. त्यानुसार, RCBच्या नव्या संघाला मेंटॉर म्हणून एबी डिव्हीलियर्सचं मार्गदर्शक मिळू शकेल.

RCB ने आपल्या ट्वीटर हँडलवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यात १२ मार्चला होणाऱ्या अनबॉक्सिंगबद्दल नमूद करण्यात आलं आहे. यात नव्या कर्णधाराच्या नावाचीही घोषणा केली जाणार असल्याची चर्चा आहे. सध्या तरी RCBचा संघ आफ्रिकन माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यावरच नेतृत्वाची जबाबदारी सुचवेल असं बोललं जात आहे. विराटने IPL 2021 सुरू होण्याआधीच जाहीर केलं होतं की त्याचा कर्णधार म्हणून हा शेवटचा सीझन असेल. त्यानुसार तो सीझन संपल्यावर पदावरून पायउतार झाला. त्यानंतर तो टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधीव कर्णधारपदावरूनही दूर झाला.

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीएबी डिव्हिलियर्स
Open in App