लंडन : भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामना जिंकला. त्यामुळे एकीकडे भारताच्या विजयाची चर्चा आहे, तर दुसरीकडे भारताचा कर्णधार विराट कोहलीची. कारण कोहलीने या सामन्यात एक झेल पकडत शिवी हासडली आणि त्यामुळेच तो टीकेचा धनी ठरत आहे. त्याने ही शिवी का हासडली आणि त्याने कोणत्या गोष्टीचा बदला या सामन्यात घेतला, हे तुम्हाला माहिती नसेल.
पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. इंग्लंडकडून जोस बटलरने चांगील फलंदाजी केली. पण या सामन्यातील कुलदीप यादवच्या सतराव्या षटकात बटलरने एक मोठा फटका मारला होता. हा त्याचा फटका चुकला आणि चेंडू लोकेश राहुलच्या जवळ येऊन पडला. यावेळी राहुलला हा झेल टिपण्याची नामी संधी होती. पण त्याला हा झेल टिपता आला नाही. त्यावेळी कुलदीप आणि कोहली यांनी राहुलकडे रागाने पाहिले. कुलदीप राहुलला यावेळी अपशब्दही बडबडला.
बटलरचा बळी आपल्याला मिळाला असता, याचा विचार तो करत होता. पण जे राहुलला जमलं नाही ते कोहलीने करून दाखवलं आणि त्याने बटलरच्या विकेटचा बदलाही घेतला. कारण याच सतराव्या षटकात कुलदीपच्या चेंडूवर बटलरने पुन्हा एकदा मोठा फटका मारला. हा चेंडू कोहलीच्या जवळ आला आणि कोहलीने हा झेल टिपला. त्यामुळेच झेल पकडल्यावर कोहलीने शिवी हासडली, असे म्हटले जात आहे.